Wednesday, January 15, 2025

/

गोवा पोलिसांकडून ५५ वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा गौरव

 belgaum

बेळगाव लाईव्ह -मूळचे तासिलदार गल्लीचे असलेल्या आणि गोव्याच्या पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या कै शिवाजीराव आनंदराव चव्हाण यांच्या चिरंजीवांचा सत्कार गोव्यात पोलिसांच्या वतीने नुकताच करण्यात आला.

शिवाजीराव चव्हाण हे एक साधा पोलिस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर स्वतःच्या कर्तुत्वावर टप्याटप्याने बढती घेऊन एस आर. पी. मधे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. त्याचवेळी त्यांची गोव्यात डेप्युटेशन वर बदली झाली.

गोवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मोठा वाटा आहे. त्या वेळी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक व रायफल देऊन सन्मानित करण्यात आले होते. एक कर्तृत्वदक्ष व धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. पोलिस दलातील सेवा बजावतं असताना त्यांना नाटकांचे दिग्दर्शन करण्याची आवड होती.राज्य राखीव पोलिस दलाच्या नाट्य स्पर्धेत “दाटला चोहीकडे अंधार” या नाटकाला व दिग्दर्शकाला प्रथम पारितोषिक मिळाले होते.Police

गोवा पोलीस सक्षम करण्यासाठी त्यांची निवड पोलीस ट्रेनिंग स्कूल प्राचार्यपदी करण्यात आली. बेळगांव व आजूबाजूच्या खेड्यांतील अनेक तरुणांना पोलिस दल, शिक्षक, व इतर क्षेत्रात नोकऱ्या लाऊन दिल्या. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ख्याती होती. ५५ वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेल्या सहकारी संस्था आजही व्यवस्थित कार्यरत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन गेल्याच आठवड्यात त्यांचे चिरंजीव प्रदीप यांचा शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोव्यात चे पोलिस प्रमुख,आय.जी.पी., डी.वाय. एस.पी. व इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.