Saturday, March 1, 2025

/

घर सोडून पळून गेली दोन मुलाची आई पतीने केली प्रियकराच्या घराची नासधूस

 belgaum

बेळगाव लाईव्ह :एक व्यक्ती विवाहित महिलेसोबत पळून गेल्याच्या रागातून तिच्या पतीच्या घरच्यांनी प्रियकराच्या घरावर हल्ला केले असून, घरातील साहित्य व इतर वस्तू नासधूस केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावात घडली आहे.

जिनराळ येथील विवाहित असलेल्या लगमना वालीकर याने त्याच गावातील दोन मुलाची आई असलेल्या महिलेसोबत पळून गेला आहे.सदर बाब महिलेच्या नवऱ्याच्या घरच्यांना कळल्यावर , प्रियकराची आई राहत असलेल्या घरावर हल्ला केले. घरात असलेले सर्व साहित्याची नासधूस केली. इतक्यावरच न थांबता घरावर दगडफेक केल्याचे प्रियकराच्या आईने आरोप केला आहे.

प्रियकराच्या आई म्हणाल्या माझ्या मुलाच्या प्रकरणाविषयी मंगळवारी गावातील ज्येष्ठांच्या समोर समेट करण्यात आले होते. माझ्या मुलाने केलेल्या चुकीसाठी त्याला शिक्षा द्या असे म्हणणे मांडले होते.
त्याच रात्री 8 च्या दरम्यान आजूबाजूचे लोकांच्या एका गटाने लोक हातात कुऱ्हाड, खुरपे, काठ्या घेऊन येत असल्याचे पाहून आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो.Chikodi

घरात मी व आमच्या आत्या व आणखीन एक मुलगा थोडक्यातच बचावलो. घरावर हल्ला केल्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पण वेळेवर पोलिस आले नाहीत. यामुळे आमच्या घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नाही.

तसेच घरातील सोने, चांदीची दागिने व पैसे लुटून घेऊन गेले आहेत. याविषयी यमकनमरडी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे असे सांगितल्या.
सद्या घटनेविषयी आलेल्या तक्रारीनुसार यमकनमरडी पोलिस स्थानकात प्रकरण दाखल करून तपास सुरू केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.