Thursday, May 9, 2024

/

दोन्ही राज्यांच्या नियुक्त मंत्र्यांच्या बैठकीसाठी प्रयत्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांची नेमलेल्या त्रिसदस्यीय कमिटीची बैठक बोलवा यासाठी केंद्र सरकारचा समन्वयक नियुक्त करा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत.

या शिवाय सुप्रीम कोर्टातील प्रलंबित खटल्याला गतिशील  बनवण्यासाठी पाठपुरावा करून वकिलांची बैठक घेणार व त्यासंबंधी तात्काळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असताना महाराष्ट्र सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत. आज महाराष्ट्र मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एका महिन्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी दुसरी बैठक घेत समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.Mes meet

 belgaum

या बैठकीसंदर्भात सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या बैठकीत प्रामुख्याने सीमाप्रश्नी महाराष्ट्राने केंद्राशी समन्वय साधून सीमावासियांच्या बाजू मांडणे, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्षांतर्गत देण्यात येणारी महात्मा फुले वैद्यकीय योजना सीमाभागातील ८६५ गावातील मराठी भाषिकांसाठी लागू करण्यात यावी, यासाठी सुरु करण्यात येत असलेला शिनोळी येथील कक्ष, तेथील अधिकाऱ्यांची नियुक्ती, सीमाप्रश्नी याचिकेबाबत पाठपुरावा, कर्नाटकाच्या सीमासमन्वयक मंत्र्यांची नेमणूक करून तात्काळ केंद्रासमवेत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करणे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

बेळगाव सीमावाद अस्तित्वात असताना 865 गावांमधून कन्नड सक्तीचे अंमलबजावणी करू नये असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याला लिहिणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधानांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जाणार आहे असेही  बैठकीत ठरवण्यात आले आहे.

या बैठकीला महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, रमाकांत कोंडूस्कर प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई, दिनेश ओऊळकर, ऍड. संतोष काकडे, रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील, रणजित चव्हाण पाटील, आनंद पाटील, जयराम मिरजकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.