33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 1, 2024

महापालिकेच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बेळगाव लाईव्ह:महापालिकेच्या अंतर्गत नागरी दारिद्र्य निर्मूलन उपक्रम 24.10 टक्के, 7.25 टक्के आणि 5 टक्के तर एसएफसी अंतर्गत 24.10 टक्के योजनेअंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. या योजनांतर्गत...

कल्लेहोळचा तो युवक खानापूरात करत होता घरफोडी

बेळगाव लाईव्ह : 2021 पासून खानापूर तालुक्यातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या युवकाला बेळगाव जिल्हा पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या जवळून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव पोलिसांना...

अस्तित्वाच्या लढाईसाठी लोकसभा!

बेळगाव लाईव्ह विशेष : सीमाभागात सध्या मराठी माणसाचे अस्तित्व संपविण्याचा घाट सुरु आहे. जमिनी संपादित करणे, मतदार संघाचे विभाजन करणे, ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आपले पाय घट्ट रोवून उभा आहे त्या ठिकाणी आमिषबाजी करून मराठी माणसाचा एकसंघपणा तोडणे,...

बेळगाव रेल्वे विभागासाठी अर्थसंकल्पात अशी तरतूद

बेळगाव लाईव्ह : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बेळगाव रेल्वे विभागासाठी निधीची तरतूद केली असून बेळगाव - धारवाड मार्गे कित्तूर या ७३.१० किलोमीटर रेल्वेमार्गा वरील कामकाजासाठी (छत्रीचे कामकाज PB#22/2019- 20/NR) एकूण ६०२,४०,०० रुपयांच्या...

कॉलेज रोडसह देशमुख रोडने घेतला मोकळा श्वास

बेळगाव लाईव्ह : रहदारी पोलिसांकडून आरपीडी कॉलेज रोड, आरपीडी सर्कल आणि देशमुख रोड या ठिकाणी दुतर्फा होणारे वाहनांचे पार्किंग हटविल्यामुळे दोन्ही रस्ते प्रशस्त वाटू लागल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सदर तीनही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क...

बेळगाव -इंदोर विमानसेवा पूर्वत सुरू करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह: स्टार एअरलाइन्सची बेळगाव ते इंदोर विमान सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ही विमान सेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मुंबई, बेंगलोर, दिल्ली प्रमाणे बेळगाव येथील लोकांचे नोकरी-व्यवसाय कामधंद्यानिमित्त...

लोकसभा निवडणुकीबाबत वि.प. प्रकाश हुक्केरी यांचा खुलासा

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांकडे इच्छुकांची रीघ लागण्यास सुरुवात झाली असून लोकसभा निवडणुकीत कोणते नेते आपले नशीब आजमावणार यासंदर्भातील चर्चांना ऊत आला आहे. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचेही नाव चर्चेत आले असता त्यांनी मात्र आपण लोकसभा...

आव्हानांच्या काळातही भारताची उज्वल भविष्याकडे वाटचाल – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी, आव्हानांचा काळ असूनही भारताची आज उज्वल भवितव्याकडे वाटचाल सुरु असल्याचे सांगत जुलै महिन्यात परिपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात...

वाजपेयी आश्रय योजनेतील घरे कधी मिळणार?

बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण मतदार संघातील वाजपेयी आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधून आम्हाला लाभार्थींना त्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी तिसरा क्रॉस महाद्वार रोड, शहापूर येथील 300 गरीब कुटुंबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाद्वार रोड परिसरातील गरीब कुटुंबातील गृहिणी महिलांनी आज गुरुवारी...

आर्थिक संस्था अतिक्रमित करताहेत शेतीचे रस्ते

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड जवळील गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या शहापूर गाडे मार्ग या रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली वडगाव, शहापूर, येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेती सुधारणा युवक मंडळाच्या...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !