Wednesday, September 11, 2024

/

शेट्टर यांच्या पाठोपाठ सवदींची पाऊलेही भाजपच्या वाटेवर??

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेग पकडत असून राष्ट्रीय पक्षांमधील नेत्यांचे पक्ष बदल सत्र मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसी नंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना देखील भाजपमध्ये पुन्हा परत आणण्यासाठी हायकमांडच्या हालचाली सुरु झाल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार रमेश कत्ती यांनी केला आहे.

जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरवापसी नाट्याला सुरुवात झाली असून जगदीश शेट्टर यांच्या पाठोपाठ आता लक्ष्मण सवदी यांनाही भाजपमध्ये परत आणण्यासाठी हायकमांडशी चर्चा झाल्याचे स्थानिक नेत्यांनी या आधीच सांगितले होते. मात्र आता या वृत्ताला रमेश कत्ती यांनीही दुजोरा दिला आहे.

जगदीश शेट्टर यांच्यानंतर काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी हे देखील पक्ष सोडतील, अशी चर्चा सुरु असून सोमवारी बेळगाव जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सवदी यांनी भाजप नेत्यांसोबत फेरफटका मारून एकत्र जेवण केल्याचेही निदर्शनात आले आहे. यामुळे आता लक्ष्मण सवदी यांच्या घरवापसीच्या चर्चेला मोठे उधाण आले आहे.Savadi

चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी कित्तूर येथील भाजप आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्यासमवेत लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर एकाच वाहनातून डीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली.

रमेश कत्ती यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर मोठी उत्सुकता निर्माण झाली असून लक्ष्मण सवदी यांनी जुन्या मैत्रीला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. मात्र यासंदर्भात लक्ष्मण सवदी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण केवळ डीसीसी बँकेच्या बैठकीच्या उद्देशाने एकत्र आलो असून यात विशेष असे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बेळगाव लाईव्ह : चिक्कोडी मतदार संघातून भाजपचा उमेदवार कोण असावा हे हायकमांडच ठरवेल, भाजप हायकमांडच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.

बेळगावमधील पत्रकारांशी संवाद साधताना चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमधून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत चिक्कोडीतून भाजपचा उमेदवार कोण असावा हे हायकमांड ठरवेल. हायकमांड ज्याला उमेदवारी देईल, त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, असे ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.