Friday, October 18, 2024

/

मर्यादा संपुष्टात आणून देखील अद्याप ‘वंदे भारत’च्या विस्ताराला विलंब

 belgaum

बेळगाव लाईव्ह :माहिती हक्क चौकशीला उत्तर देताना रेल्वे क्र. 20661 /20662 बेंगलोर -धारवाड -बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेसच्या चांचणी दौडप्रसंगी नैऋत्य रेल्वेने तिच्या ऑपरेशनल आणि टर्मिनल मर्यादा स्पष्ट केल्या होत्या.

बेळगावपर्यंत वंदे भारत सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने संबंधित मर्यादा संपुष्टात आणण्यात आल्या आहेत आहे. बेळगाव येथील वॉटरिंग आणि ओएचई ओव्हरपीट लाईनशी संबंधित समस्या केंव्हाच निकालात काढण्यात आली आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेली अत्यंत अपेक्षित केएसआर बेंगलोर ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची चांचणी दौड गेल्या 21 नोव्हेंबर 2023 रोजी यशस्वीरित्या पार पडली.

अपवादात्मक गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक अशा सदर रेल्वेचा केएसआर बेंगलोर ते बेळगाव पर्यंतचा आणि पुन्हा परतीचा पहिला प्रवास कोणत्याही समस्येविना सुरळीत पार पडला.

त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी वंदे भारतसाठी आवश्यक असणाऱ्या वॉटरिंग आणि ओएचई ओव्हरपीट लाईन सुविधेची पूर्तता करण्यात आली. एवढे करून देखील वंदे भारत एक्सप्रेसची बेळगाव पर्यंतची सेवा अद्यापही का सुरू झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी सदर रेल्वेच्या देखभालीशी संबंधित कांही घटकांची कमतरता आहे? की येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सदर रेल्वे सुरू करून जनतेची मन जिंकण्यासाठी सध्या जाणून बुजून या रेल्वे सेवेच्या बेळगाव पर्यंतच्या विस्ताराला विलंब केला जात नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.