बेळगाव लाईव्ह:एका झाडाची फांदी पडून कारचे नुकसान झाल्यामुळे रस्त्याशेजारी चक्क तीन झाडांच्या फांद्या तोडून त्यांची कत्तल करण्यात आल्याची घटना वंटमुरी कॉलनी सेक्टर 7 मध्ये घडली असून याबद्दल पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत परवानगी न घेता वंटमुरी कॉलनी सेक्टर 7 येथील पोस्ट ऑफिस नजीक असलेल्या रस्त्याशेजारी तीन झाडांच्या फांद्यांची कत्तल करण्यात आली आहे.
रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एका कारवर झाडाची फांदी तुटून पडली. या कारणास्तव चक्क तीन झाडांच्या फांद्या तोडून त्यांना बोडके करण्याचा प्रकार वंटमुरी कॉलनी सेक्टर 7 येथे घटना असून यामुळे वृक्षप्रेमी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे कोणाच्या परवानगीने संबंधित झाडांची कत्तल करण्यात आली असा सवाल केला जात आहे.
नैसर्गिकरित्या झाडाची फांदी पडून कारचे नुकसान झाल्याच्या संतापातून करण्यात आलेल्या या गैरकृत्याकडे वन खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे.