Wednesday, November 27, 2024

/

वैद्यकीय मदतीसाठी बेळगावात यांना साधू शकता संपर्क

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली आहे. तसेच आवश्यक उपचार, शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या एकंदरीत उपचार मदतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची  विशेष बैठक झाली.

गोवावेस येथील श्री सिध्दीविनायक सेवा केंद्र येथे झालेल्या या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर महेश नाईक होते. सीमाभागातील मराठी भाषिकांना आवश्यक उपचार आणि चिकित्सेसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबद्दल बैठकीत महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. या सहाय्यता निधीचा सीमाभागातील ८६५ गावातील नागरिकांना लाभ होणार आहे. यामुळे
गरजूंना ही मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती देण्याकरिता समितीच्या काही निवडक कार्यकर्त्यांची आणि सेवा केंद्रांची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज असेल, त्यांनी या कार्यकत्यांशी किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

त्यानुसार प्रमुख कार्यकत्यांची नावे.

रमाकांत कोंडुसकर 9663831333,सागर पाटील9964777565, माजी महापौर महेश नाईक9945010162, महादेव पाटील9481535528, सुनील बोकडे9448866930, भरत नागरोळी997275021, अमित कोलकार8660323332, कपिल भोसले9844595385, प्रवीण किल्लेकर, सूरज चव्हाण, अनिल आमरोळे9342462306, किरण धामणेकर9663454841, अंकुश केसरकर, आनंद आपटेकर, गुणवंत पाटील, विकास कलघटगी9448470235, शुभम शेळके, निरंजन सरदेसाई, धनंजय पाटील7899094108  , शंकर बाबली9945334058, मनोहर संताजी, राजू वर्पे, अरुण मालवणकर अशी आहेत.

सेवा केंद्रांचे संपर्क क्रमांक असे

■ प्रशांत भातकांडे सेवा केंद्र, विठ्ठलदेव गल्ली, शहापूर.मोबाईल : ९९४५५४८९३८■ श्री सिद्धी विनायक सेवा केंद्र, गोवावेस-शहापूर (डाक बंगला)मोबाईल : ९४४८८६६९३० म. ए. समिती सेवा केंद्र, खडक गल्ली, बेळगाव ■ नगरसेवक शिवाजी मंडोळकर सेवा केंद्र, शिवाजीनगर, बेळगावमोबाईल : ९९६४०७००७२■ रंगुबाई भोसले पॅलेस, म. ए. समिती शहर सेवा केंद्र, मोबाईल : ९४४८१४५१९८

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.