बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कणबर्गी येथील रामतीर्थ नगरच्या हद्दीत तब्बल ८९ लाख ६० हजार रुपयांचा विविध बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता.
या कारवाईअंतर्गत विविध अवैध मद्य वाहतूक आणि विक्री प्रकरणात जप्त केलेला तब्बल ८९ लाख ६० हजार रुपयांचा विविध बनावटीचा मद्यसाठा बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज नष्ट केला. कणबर्गीजवळील मैदानात जेसीबी लावून हा मद्यसाठा नष्ट करण्यात आला.
अवैध मद्य वाहतूक आणि विक्री, गोवा बनावटीचे मद्य, बनावट मद्य विक्री अशा एकूण १०१ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मद्यसाठा नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
एकूण १०१ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला बेकायदेशीर मद्यसाठा व बनावट गोवा डिस्टिलरी, बिअर आदी ८९ लाख ६० हजार किमतीचा नामांकित मद्यसाठा नष्ट करण्यात आला. यात १८२९७ लीटर मद्य, ४०६१ लीटर बिअर, तस्करी मद्य ६६५ लीटर असा एकूण ८९ लाख ६० हजार किमतीच्या मद्यसाठ्याचा समावेश आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम. यांनी बेकायदेशीर दारूचे सेवन करण्यापासून लोकांना रोखणे हा आमच्या विभागाचा मुख्य उद्देश सांगितले. सदर मद्यसाठा नष्ट करताना अबकारी खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.