बेळगाव लाईव्ह : साहिल लुधियानवी आचार्य अत्रे आणि मुंशी प्रेमचंद यांच्या आठवणी जाग्या ठेवणार बेळगाव हे एक संवेदनशील गाव आहे असे प्रतिपादन मुंबईचे जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
प्रगतशील लेखक संघ बेळगावतर्फे आयोजित तिसरे मराठी साहित्य संमेलन आज रविवारी रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील आचार्य अत्रे साहित्यनगरी संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडले त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.
सर्व निकषावर खरा असणारा आणि लोकशाही मार्गाने गेली 67 वर्षे चाललेला सीमा प्रश्नाचा लढा न्याय प्रविष्ट आहे परंतु त्या न्यायाचा पत्ता कुठे आहे असा परखड सवाल भावे यांनी केला.
ते पुढे म्हणाले सीमा भागातील जनतेने अत्रेंची आठवण ठेवली पण महाराष्ट्राला त्यांचे विस्मरण झालं आचार्य अत्रे हे सीमा प्रश्नासाठी राजीनामा देणारे एकमेव आमदार होते गांधीजींनी स्वातंत्र्या नंतर दंगल ग्रस्तांचे अश्रू पुसले त्याच प्रमाणे अत्रेनी संयुक्त महाराष्ट्राचा जल्लोष सुरू असताना बेळगावात आंदोलन उभे केले. आचार्य अत्रे यांचे आणि महात्मा गांधीजींचे जीवन तत्व होते. अत्रेंचे महाराष्ट्राला विस्मरण होणे ही दुर्दैवी घटना आहे विचारवंतांना उभा केलेला महाराष्ट्र आता धटिंगणांच्या हाती गेलेला आहे त्याच्या विरुध्द आवाज उठवावा लागेल.
महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारने प्रभावीपणे सीमा प्रश्नाचा पाठपुरावा केला नाही यासाठी महाराष्ट्रात मोठा लढा उभा करावा लागेल असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारितेवर बोलताना त्यांनी म्हटले की पत्रकारात समाज बदलण्याची ताकत आहे. मेहनत से ज्यादा लेना वाजिब नही है या लोकमत च्या हेडलान्स ने इतिहास घडवला होताअसे त्यांनी म्हटले.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून अन्नपूर्णा परिवार पुण्याच्या अध्यक्ष मेधा सामंत -पुरव उपस्थित होत्या. उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते डॉ भालचंद्र कांगो, प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे, सेक्रेटरी काॅ. कृष्णा शहापूरकर, ज्येष्ठ कामगार नेते ॲड. नागेश सातेरी आदी उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक प्रा आनंद मेणसे यांनी केले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष भावे व उद्घाटिका मेधा सावंत -पुरव यांचा घोंगडी, पुष्पगुच्छ व ‘भुरी’ या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या उद्घाटनपर भाषणात मेधा सामंत -पुरव यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना कांगो म्हणाले की,आजची वास्तविकता भयानक आहे आणि या भयानक वास्तविकतेचं भान जनतेला करून देण्याची गरज आहे. हे काम पत्रकारांचे आहे. मात्र आज पत्रकार काय करत आहेत? आज प्रसार माध्यमांवर सरकारचे नियंत्रण आहे. पत्रकारितेचे कर्तव्य, बांधिलकी पार पाडण्याऐवजी मालकवर्ग जाहिराती मिळवून वृत्तपत्रे चालवत आहेत. हा मालकवर्ग जाहिराती कोण देतो? किंवा जाहिराती कोणाकडून मिळणार नाहीत? याची जास्त काळजी घेतो. तो जनतेची फारशी काळजी करत नाही असे सांगून डॉ. भालचंद्र कांगो यांनी अयोध्येतील श्री राम मंदिर वगैरे विविध मुद्द्यांवर परखड मत मांडले.
संमेलनाच्या तिसऱ्यात सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे ‘लोकशाहीचा फॅसीझमचा धोका कधी असतो?’ या विषयावर विशेष व्याख्यान पार पडले. त्याचप्रमाणे डॉ हमीद दाभोलकर यांचे ‘निर्भय जीवन कसे जगावे?’ या विषयावर व्याख्यान झाले. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात जयसिंगपूरच्या ज्येष्ठ कवयित्री प्रा डाॅ. सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतशील लेखक संघाच्या कवींचे कवी संमेलन पार पडले. आजच्या या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.