Tuesday, May 7, 2024

/

बेळगावमधील ‘त्या’ घटनेतून ॲड. अमर येळ्ळूरकर दोषमुक्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह : समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बेंगळूर येथे २०२१ साली विटंबना करण्यात आली होती. याविरोधात संतापलेल्या शिवप्रेमींनी सदर प्रकरणातील दोषींना अटक करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात धरणे आंदोलन छेडले होते. यादरम्यान निर्माण झालेल्या तणावानंतर कर्नाटक सरकारने ॲड.

अमर येळ्ळूरकर यांच्यासह अनेक शिवप्रेमींवर खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणी कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सुनावणी झाली असून याप्रकरणी
ॲड.अमर येळ्ळूरकर यांना दोषमुक्त केले आहे.

२०२१ साली बेंगळुरू मध्ये झालेल्या या घटनेचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. यानंतर १८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी धर्मवीर संभाजी चौकात शांततेत धरणे आंदोलन सुरु होते. यादरम्यान पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत शिवप्रेमी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी कॅम्प, खडेबाजार आणि मार्केट पोलीस स्थानकात विविध आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले.Amar yellukar

 belgaum

यामध्ये वकील. अमर येळ्ळूरकर यांचाही समावेश होता. भादंवि २०८/२०२१ अंतर्गत खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जनतेला प्रक्षोभक पद्धतीने भडकावणे अशा पद्धतीचे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरणाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे दाद मागण्यासाठी ॲड.राम घोरपडे यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी धारवाड खंडपीठासमोर याचिकेवर कामकाज सुरु असताना मा. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून २० जानेवारी २०२४ रोजी निकाल दिला. याप्रकरणी पोलिसांनी खोटे आरोप करून गुन्हे दाखल केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे सर्व गुन्हे बेदखल करत ॲड.अमर येळ्ळूरकर यांना दोषातून मुक्त केले आहे.

यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ ने वकील. अमर येळ्ळूरकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी याप्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांनी दिली असून बंगळूरमध्ये झालेल्या शिवमूर्ती विटंबना प्रकरणी कर्नाटक सरकारने शिवप्रेमींवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन शिवप्रेमींना दोषमुक्त करण्याची मागणी त्यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.