बेळगाव लाईव्ह :आनंद नगर भागात दररोजच्या चोरीच्या घटनेने कंटाळून आनंद नगर रहिवासी संघटनेच्या वतीने शिवमंदिर, वडगाव बेळगाव बैठक बोलावून गल्लीतील नागरिकांच्या बरोबर चोरीच्या घटनेपासून घ्यावयाच्या सुरक्षेविषयी सूचना करण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात या भागात रात्रीच्या आणि दिवसाच्या चोऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे जनतेनेच स्वयंप्रेरीत पाऊले उचलली आहेत. रात्री युवक गस्त घालत आहेत. या भागातील जनतेला करण्यात आलेल्या सूचना अश्या आहेत.
वडगाव भागातील नागरिकांनी नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शक सूची सांगण्यात आली आहे.
यामध्ये नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे घट्ट बंद करून दरवाज्याला लागून टेबलावर तांब्या किंवा भांडे ठेवणे, जेणेकरून दरवाजा उघण्याचा प्रयत्न कुणी केलाच तर घरातील लोकांना जाग यावी. तसेच, घरावर सी सी टी व्ही बसविणे,महिलांनी आपल्या दागिण्यांचे प्रदर्शन करू नये, दागिने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवणे, गल्लीतील नागरिक समूह करून एकमेकांच्या संपर्कात राहणे, घराबाहेरील दिवे चालू ठेवणे, घरी मोक्याच्या वेळी कामी येईल अशा लाठ्या काठ्या बाळगणे, गल्लीतील फिरत्या विक्रेत्यांना प्रवेश नाकारून त्यांच्या कडून कोणतेही वस्तू खरेदी करू नये. अनोळखी व्यक्तीला थारा देऊ नये अशा अनेक सुरक्षेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.
बेळगाव शहरातील वडगाव भागात चोरट्यानी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे वडगाव बस मध्ये देखील खिसे कापूनी पाकीटमारीची केल्याची घटना घडली आहे.वडगाव भागातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्वयंप्रेरनेने युवक रात्रीची गस्त घालत आहेत या शिवाय पोलिसांनी देखील जनतेला आवाहन करत दिवसा किंवा रात्रीच्या वेळी घरचे दरवाजे व्यवस्थित बंद करावे किंवा घरा बाहेर जाणाऱ्यानी शेजाऱ्यांना कल्पना द्यावी असे आवाहन केले आहे.
एकीकडे चोरीची संख्या वाढली असताना पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून शहापूर आणि टिळकवाडी पोलिसांनी यावर विशेष लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी वाढू लागली आहे.