Tuesday, May 21, 2024

/

कट्टर शिवभक्त हरपला…

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भोज गल्ली शहापूर येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता अभिषेक पुजारी वय 26 यांचे हृदविकाराने मंगळवारी अकाली निधन झाले.

अभिषेक हा युवक मनमिळावू स्वभावाचा म्हणून लोकांच्यात परिचित होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. श्रीराम सेना हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि चंद्रकांत कोंडुसकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्याची ओळख होती.

शिवकार्यात नेहमीच धडाडीने भाग घेणाऱ्या अभिषेक वाचून भोज गल्लीतील शिवजयंती आता अपुरी वाटणार आहे.शिवभक्त म्हणून ओळख असणाऱ्या अभिने नेहमीच शिवजयंतीच्या काळात घरचे कार्य समजून त्यात भाग घेतला ज्यावेळी बंगळुरु येथे शिव पुतळ्यांची विटंबना झाली त्यावेळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात केलेल्या आंदोलनात त्याला अटक झाली आणि 47 दिवसाचा तुरुंगवास घडला.त्याला याविषयी छेडले असता “राजाचे कार्य आणि दादाची साथ आम्हा तरुणांना असेल तर तुरुंगवास आम्हाला पर्यटनासारखा वाटतो” हे त्याचे उद्गगार शिवकार्याविषयी आणि कोंडूस्कर यांच्या विषयी आदर व्यक्त करणारे होते.Srs abhi pujari

 belgaum

आपल्या लाघवी स्वभावाने सर्वच स्तरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिजीत याचे जाणे अनेकांच्या काळजाला चटका लावून गेलं.

श्री दुर्गामाता दौडच्या वेळी गल्लीत भगव्या पताका, भगवे झेंडे लाऊन भगवेमय वातावरण करणारा रांगडा मराठा गडी आता असणार नाही या जाणिवेनेचं अनेकांची हृदये हेलावली.

पूर्ण शहापूर भागातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे कामकाज तो प्रामुख्याने पाहत होता.तिशीचे वय जायचे ते काय? असा आक्रोश बाया बापड्या करत असतानाच, श्री रामसेना हिंदुस्थानची मोत्याची माळ आज निसटली आणि त्यातील एक अनमोल मोती घरगळून गेला ही विषण्णता पुऱ्या श्री रामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यात पसरली.

त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे मंगळवारी सायंकाळी शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.