बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीआधी राज्यात तीन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याची मागणी होत आहे. याकरिता पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी दिल्लीला रवाना झाले आहेत. निकटवर्तीय आमदार, प्रमुख हिंदू दलित नेत्यांसह जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांची भेट ते घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि लिंगायत नेत्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावावी. त्यामुळे वक्कलिग, मागासवर्गीय अशा सर्वांनाच न्याय दिल्यासारखा होईल, असे जारकीहोळींचे मत आहे.
चर्चेला आला आहे. कोणत्याही प्रकारे तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा हट्ट जारकीहोळी यांचा आहे. यापैकी एक पद आपल्याला देण्याची मागणी ते करणार आहेत.
याआधी मंत्री के. एन. राजण्णा यांनी राज्यात तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर श्रेष्ठींनी त्यांना जाहीर विधाने करू नयेत, अशी ताकीद दिली. त्यानंतर हा विषय मागे राहिला होता. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री नियुक्तीचा विषय
चर्चेला आला आहे. कोणत्याही प्रकारे तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा हट्ट जारकीहोळी यांचा आहे. यापैकी एक पद आपल्याला देण्याची मागणी ते करणार आहेत.
उपमुख्यमंत्री नियुक्तीविषयी पक्षामध्ये अंतर्गत वाद होऊ नये म्हणून काँग्रेस श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद नियुक्तीचा विषय टाळला होता. तसे असले तरी काही काँग्रेस नेत्यांनी याकरिता श्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आता जारकीहोळींनी याबाबत पुढाकार घेतला असून लवकरच विषय निकाली काढला जाणार आहे.
कारण काय?
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगावातील राजकारणात हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण तीन उपमुख्य मंत्रिपदे अस्तित्वात आणण्यात येणार आहेत. याद्वारे जारकीहोळी शिवकुमार यांना राजकीय शड्डू ठोकण्याचा प्रयत्न करणार आहेत.