Saturday, June 15, 2024

/

महामेळाव्याला परवानगी नाही शिनोळीत रस्ता रोको

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशन विरोधी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलन किंवा महा मेळाव्यास परवानगी नाकारल्याने शिनोळीत रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेला आहे .आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे.

या संदर्भात एक पत्र ही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे याची दखल घेऊन आज दिनांक 3 12-2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक होऊन या बैठकीमध्ये शिनोळी येथे रास्ता रोको कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले.Krishna

 belgaum

यासाठी उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता बेळगाव खानापूर निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारका जवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे .Mes melava

हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी 11 वाजता रास्ता रोको कार्यक्रमाला शिनोली येथे सुरुवात करावयाची आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हे महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार सीमा भागातील जनतेवर जो अन्याय करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचे या सीमा भागातील जनतेकडे आणि सीमा प्रश्न सोडवणुकीकडे होत असलेले दुर्लक्ष यांचाही निषेध यावेळी करण्यात येणार आहे .

दरम्यान रविवारी सकाळी  वाक्सिन डेपो मैदानाची समिती नेत्यांनी पाहणी केली त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी नसल्याचे पत्र दिले त्यावर मध्यवर्ती समिती नेत्यांनी बैठक घेऊन सोनाली आंदोलन करण्याचे जाहीर केले.

गेल्या काही वर्षे सीमा महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांचे सीमाभागाकडे दुर्लक्ष केला आहे याशिवाय सीमा भागाच्या हक्काच्या काही मागण्या अमलात आणल्या नाहीत यासाठी महाराष्ट्र सरकार चा सुद्धा निषेध या बैठकीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.