बेळगाव लाईव्ह:नाथ पै चौक, शहापूर येथील श्री काळभैरव मंदिरमध्ये आज मंगळवारी श्री काळभैरव जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
जयंती उत्सवानिमित्त श्री कालभैरव मंदिरमध्ये आज मंगळवारी पहाटेपासून अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. तसेच देवाची पूजा व आरती झाल्यानंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री काळभैरव जयंतीनिमित्त यावेळी नवनाथ स्वरूप दर्शन मूर्तीचे उदघाटन रुद्रनाथ महाराज पंजाब व श्रीमती लक्ष्मी गुरुनाथ राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.
शहापूरसह शहरातील शेकडो समाज बांधव आणि भक्तांनी जयंती उत्सवासह देवदर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री कालभैरव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश नाईक यांनी जयंती उत्सवाच्या आयोजनाबद्दल प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.
श्री काळभैरव जयंती साजरी होण्यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश नाईक, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सेक्रेटरी विजय नाईक, उपसेक्रेटरी अरुण राऊळ, खजिनदार अशोक राऊळ, उपखजिनदार, महंतेश राऊळ, कल्लाप्पा राऊळ, परशराम राऊळ, अरविंद राऊळ, विश्वनाथ नाईक,
दिनेश राऊळ, उदय राऊळ, सुरेश चव्हाण,साई रानेबेंनूरकर, संतोष राऊळ, सुरेश नाईक आदिंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जयंती उत्सवानिमित्त संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
श्री काळभैरव मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी महेश नाईक
नाथ पै चौक, शहापूर येथील श्री काळभैरव मंदिर ट्रस्टच्या नूतन अध्यक्षपदी माजी महापौर महेश नाईक यांची तर सचिवपदी विजय नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
श्री काळभैरव मंदिर ट्रस्ट कमिटी आणि सभासदांच्या गेल्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली. ट्रस्टच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्याबरोबरच यावेळी अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री काळभैरव मंदिर ट्रस्ट, नाथ पै चौक, शहापूरची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष : महेश नाईक, उपाध्यक्ष : प्रकाश चव्हाण, सचिव : विजय नाईक, उपसचीव : अरुण राऊळ, खजिनदार : अशोक राऊळ, उपखजिनदार : महंतेश राऊळ. श्री काळभैरव मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी महापौर महेश नाईक यांचे समाज बांधवांकडून तसेच सर्वत्र अभिनंदन होत आहे.