बेळगाव लाईव्ह :घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
परशुराम इराप्पा दंडगल वय 32 रा. लक्ष्मी नगर जूने बेळगाव असे या घरफोडी करून चोरी करणाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट उपविभागाचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे.एम कालीमिरची यांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे.
माळमारती पोलिसांनी सदर आरोपीकडून सात लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ऐवज जप्त केला आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे सदर आरोपीने पोलीस तपासात दरम्यान कबूल केले आहे. माळ मारुती पोलीस अधिक तपास करत असून या चोरट्याला गजाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.