बेळगाव लाईव्ह: ट्रकच्या धडकेत वृध्द सायकल स्वार ठार झाल्याची घटना बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली.
प्रमोद भिमाजी मोहोर वय 65 रा. पार्वती नगर उद्यमबाग असे या वृध्द सायकल स्वार व्यक्तीचे नाव आहे.बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनास्थळी बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बुधवारी सायंकाळी रेल्वे गेट पडले होते त्यावेळीं कला मंदिर कडून रेल्वे फाटकातून सायकली सह गेट मधून वाकून जाते वेळी गोगटे सर्कल कडून येणाऱ्या ट्रकने प्रमोद यांना धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पहिला रेल्वे गेट परिसरात ज्यावेळी फाटक बंद होते तेंव्हा रहदारीची समस्या येत असते अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते अश्यावेळी गेट पार करून ये जा करण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. बुधवारी देखील अशीच गर्दी या ठिकाणी झाली होती त्यावेळी गेट ओलांडताना हा अपघात घडला असून सायकल स्वराला जीव गमवावा लागला आहे.
सध्या बेळगाव कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे राज्याचा राजकारभार बेळगावातून सुरू असल्याने अनेक आमदार मंत्री व्हीआयपी अधिकारी बेळगाव दाखल झाले आहेत अशावेळी शहरातून अनेक गाड्यांची वर्दळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे अशावेळी पोलिसांनी देखील लक्ष देणे गरजेचे बनले आहे.