Friday, October 18, 2024

/

परिवहन खात्याची अशी असणार विशेष बस सोय

 belgaum

बेळगाव लाईव्ह:वायव्य परिवहन महामंडळाने दसरोत्सवात सौंदत्तीतील रेणुकादेवी व कोल्हापूरमधील वाडी रत्नागिरी जोतिबा देवस्थानला जादा बसेस सोडून दहा दिवसांत ८४ लाखांचा महसूल मिळवला आहे. आता पुन्हा दिवाळी सणासाठी ५०० हून अधिक जादा बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाने दिली आहे.

तिकिटाचे आगाऊ बुकिंग केल्यास ५ ते १० टक्के सवलत दिली जाणार आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे आरामबस, स्लीपर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यातील आणि राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ११, १२, १३ व १४ नोव्हेंबर रोजी राज्याच्या विविध भागासह महाराष्ट्र, गोवा व शेजारील राज्यातील

लोक दिवाळीसाठी आपल्या मूळ गावी परतण्याची शक्यता आहे. बेळगावसह हुबळी, धारवाड, गदग, चिक्कोडी, कारवार, हावेरी, बागलकोट आगारातून बंगळूर, मंगळूर, पुणे, गोवा आणि इतर ठिकाणाहून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मल्टी- अॅक्सल व्हॉल्वो, स्लीपर, राजहंस यासारख्या ५० लक्झरी आराम बसेससह २५० हून अधिक अतिरिक्त बसेस आणि २०० एक्सप्रेस बस सोडण्याचे नियोजन आहे. तर दिवाळीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत २५० हून अधिक जादा बसेस सोडल्या जातील.

इथे करा आगाऊ बुकिंग

आगाऊ तिकीट बुकिंग संस्थेच्या www.ksrtc.in या मोबाईल अॅपवर, प्रमुख बसस्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर आणि खासगी फ्रेंचायझी काउंटरवर उपलब्ध आहे. एकाच तिकिटात चार किंवा त्याहून अधिक जागा बुक केल्यास भाड्यात ५ टक्के सूट दिली जाईल. येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी केल्यास परतीच्या भाड्यात १० टक्के सूट दिली जाईल, असे परिवहन महामंडळाकडून कळविले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.