Friday, November 22, 2024

/

बेळगावात या भागात असणार वीजपुरवठा खंडित

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बुधवारी (दि. २९) वडगावमधील ११० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते ३ तर नेहरुनगरमधील केंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी ९ ते ३ पर्यंत खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

सकाळी १० ते ३ पर्यंत चन्नम्मानगर, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे फाटक, वसंत विहार कॉलनी. वडगावमधील विष्णू गल्ली, धामणे रोड, कल्मेश्वर रोड, देवांगनगर, विजय गल्ली, रयत गल्ली, मलप्रभानगर, तेग्गीन गल्ली, वड्डर

छावणी, ढोर गल्ली. जुने बेळगावमधील गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर. हिंदवाडीतील सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, आनंदवाडी. अनगोळ परिसरातील विद्यानगर, वडगाव रोड, सहयाद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, अनगोळ मुख्य रोड, संत मीरा रोड, वाडा कंपाउंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर परिसरातील पहिला ते १० वा क्रॉस.

येळ्ळूर रोड परिसरातील संभाजीनगर, केशव नगर, केएलई,अन्नपुर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, पटवर्धन लेआउट, घुमट माळ, नाथ पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश याठिकाणी वीज नसेल.

सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत कंग्राळी औद्योगिक परिसर, इंडाल कॉलनी. शिवाजीनगरमधील आरटीओ सर्कल, वीरभद्रनगर, पोलिस मुख्यालय, पंजीबाबा मठ, फारुक कॉलनी. वैभवनगरमधील बसव कॉलनी, विद्यागिरी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहुनगर, एपीएमसी, ज्योतिनगर. शिवबसवनगरमधील केएलई

कॉलनी, जेएनएमसी, नेहरूनगर, प्रसाद रेसिडन्सी. सदाशिवनगर परिसरातील मेन डबल रोड, लक्ष्मी कॉम्लेक्स, शिवालय परिसर, बेलदार छावणी. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बिम्स, कोल्हापूर सर्कल. सुभाषनगर परिसरातील गँगवाडी सर्कल, रामदेव हॉटेल, समिती कॉलेज,

मराठा मंडळ, एसपी कार्यालय रोड. विश्वेश्वरय्या परिसरातील पाणी पुरवठा कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, रेड्डी भवन, जैन मंदिर, आदर्श कॉलनी, पीडब्लुडी कॉलनी, हनुमाननगर, रेलनगर, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, एनसीसी कार्यालय, जाधवनगर, संपिगे रोड, बुडा कॉम्प्लेक्स परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.