Wednesday, January 15, 2025

/

म. ए. समितीवरील बंदीसाठी ‘करवे’चे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन जवळ येईल तशी कानडी संघटनांची बेळगाव पुन्हा वळवळ सुरू झाली असून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणीसाठी करवे शिवरामेगौडा गटाने आज गुरुवारी बेळगावात आंदोलन छेडले.

आंदोलनादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवरामेगौडा गटाचा अध्यक्ष वाजिद हिरेकोडी याने म. ए. समितीच्या नियोजित महामेळाव्याला विरोध करत गरळ ओकली. तो म्हणाला की, बेळगावातील हिवाळी अधिवेशनादरम्यान समितीने महामेळावा आयोजनाचा घाट घातला आहे. महामेळावा घेण्यासाठी ते पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर दबाव आणत आहेत असे सांगून बेळगाव कन्नडिगांची भूमी आहे ती बळकवण्याचा प्रयत्न केला तर समितीला योग्य धडा शिकवू असा इशारा त्याने दिला.Krv

जर समितीचा महामेळावा झाला तर आम्ही पोलिसांकडे दाद मागू आणि समितीच्या विरोधात उग्र आंदोलन करू. बेळगाव सोडून जाईपर्यंत समिती नेत्यांना सोडणार नाही, अशी दर्पोक्ती हिरेकोडी याने केली. त्याचप्रमाणे राज्य सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे म. ए. समितीवरील बंदीचा गांभीर्याने विचार करून दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणीही केली.

एकंदर सरकारचे हिवाळी अधिवेशन आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांकडून बेळगावमध्ये पुनश्च भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने वेळीच लक्ष देण्याची गरज शहरवासीयांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.