बेळगाव लाईव्ह :सध्या महाराष्ट्रात जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणा संदर्भातील आंदोलन जसे उग्रतेकडे झुकले तसे गेली 66 वर्षे चाललेला सीमा लढा कधीही उग्रतेकडे झुकू शकतो. यासाठी केंद्राने आता सहानुभूतीने विचार करून मराठी माणसाच्या न्याय मागणीला न्याय द्यावा अशी मागणी मराठी माणसातून वाढू लागली आहे.
शहरातील 1 नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त सायकल फेरी काढण्यात आली शासनाची दडपशाही झुगारून मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता.1 नोव्हेंबर काळा दिनाचे मराठी भाषिकांचे आंदोलन म्हणजे एक नैमित्तिक कार्यक्रम बनले आहे. एकीकडे महाराष्ट्र दिन आहे दुसरीकडे कर्नाटक दिन आहे आणि मराठी माणसांचे मात्र दैन्य आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांचे हे आंदोलन गेली 67 वर्ष अखंड सुरू आहे. जगाच्या पाठीवर इतका प्रदीर्घ काळ चाललेला कोणताही लढा नाही. हा ऐतिहासिक लढाच म्हणावा लागेल. मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची ओळख जिवंत राहण्यासाठी मराठी माणूस आंदोलन करत आला आहे.
आता चौथी पिढी या आंदोलनात सहभागी झाली आहे तरुण वर्ग, महिलासह अबालवृद्ध तसेच वेगवेगळ्या समाज घटकातील लोक या आंदोलनात सहभागी होतात. याचा अर्थ मराठीची अस्मिता किती तीव्र आहे हे समजून येते. आंदोलनाच्या मागे दिल्ली अजिबात उभी नाही हे दुष्ठचित्र दिसून येते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात हा लढा रेंगाळला आहे. त्याला चालना मिळणे गरजेचे आहे. कारण माणसाच्या जगण्याचा हा लढा आहे.
मराठी संस्कृतीसह मराठी माणसाच्या अस्मितेचा हा लढा आहे आणि माणूस हा केंद्रस्थानी मानून जगणं केंद्रस्थानी मानलं जातं. केंद्रस्थानी असणाऱ्या माणसाचे जगणे केंद्रबिंदूपासून बाजूला जात असेल तर ते लोकशाहीचे लक्षण नाही असे मानता येईल. या पार्श्वभूमीवर विचार करता मराठी माणसाच्या या लढ्याला निर्णायक स्वरूप देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. कारण त्यासाठी मराठी माणूस गेली अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने लढत आहे असे सांगून महाराष्ट्रात जरांगे पाटलाचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन जसे उग्रतेकडे झुकले तसे गेली 67 वर्षे चाललेला हा लढा कधीही उग्रतेकडे झुकू शकतो. यासाठी केंद्राने आता सहानुभूतीने विचार करून मराठी माणसाच्या न्याय मागण्यांना न्याय देणे गरजेचे आहे अशी मागणी वाढू लागली आहे.
काळ्या दिनाच्या सायकल फेरीत एकीकडे 80 वर्षीय सीमा तपस्वी रामा शिंदोळकर तर दुसरीकडे पाच सहा वर्षाचे शेकडो बालचमू सहभागी होत चौथी पिढीही सज्ज आहे हे दाखवून दिले आहे. भालकी बीदर हून देखील मराठी भाषिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.