Tuesday, December 24, 2024

/

बैलहोंगल येथील भ्रष्ट एसडीसी लोकायुक्तांच्या जाळ्यात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बैलहोंगल येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयामधील वरिष्ठ श्रेणी कारकून (एसडीसी) मंजुनाथ अंगडी याला लोकायुक्त पोलिसांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

बैलहोंगल सहाय्यक आयुक्त कार्यालयातील मंजुनाथ अंगडी या अधिकाऱ्याच्या लोकायुक्त पोलिसांनी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुसक्या आवळल्या आहेत.

बैलहोंगल तालुक्यातील चिक्कोट एसके गावातील रवी अज्जे यांच्याकडून महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मंजुनाथ अंगडी याने 60 हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात रवी अज्जे यांनी बेळगाव लोकायुक्त कचेरीमध्ये तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकायुक्त जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंतराय आणि उपपोलीस प्रमुख बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा हुलगोर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून भ्रष्ट मंजुनाथ अंगडी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

याप्रकरणी लोकायुक्त पोलीसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.