बेळगाव लाईव्ह :भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने यावर्षी यशस्वीरित्या राबविलेल्या चांद्रयान -3 आणि आदित्य -11 मिशन या मोहिमेमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल इस्रो संस्थेने बेळगावच्या मेसर्स सर्व्होकंट्रोल्स एरोस्पेस (आय) प्रा. लि. कंपनीचा गौरव केला आहे.
चांद्रयान -3 आणि आदित्य -11 मिशन यशस्वी करण्यास हातभार लावल्याबद्दल इस्रोचे संचालक विशिष्ट वैज्ञानिक एम. शंकरन यांनी बेळगावच्या मेसर्स सर्व्होकंट्रोल्स ऐरोस्पेस (आय) प्रा. लि.ला खास सन्मान पत्र प्रदान केले आहे.
चांद्रयान -3 आणि आदित्य -11 मिशन यशस्वी करण्याद्वारे इस्रोने सर्वात मोठी कामगिरी बजावली आहे. या यशामुळे आपल्या देशाचे नांव अवकाश क्षेत्रामध्ये आघाडीवर आले आहे. या प्रकल्पासाठी मौल्यवान उद्योग भागीदार म्हणून तुम्ही अहोरात्र अविश्रांत कार्य केले असून हार्डवेअर आणि इंटरफेस प्रणालीसाठी लक्षणीय योगदान दिले आहे.
साहित्याचा पुरवठा सेवा आणि प्रणालीची चांचणी आपण वेळेवर पूर्ण केलीत. तुमच्या जबरदस्त योगदानामुळे आम्हाला आमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता आले असून त्यासाठी मी आपला आभारी आहे.
हे यश आमच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी आपल्यामधील आपल्या मधील भागीदारी अधिक बळकट मदत करेल अशी मला अपेक्षा आहे असे इस्रोचे संचालक एम. शंकरन यांनी मे. सर्व्होकंट्रोल्स ऐरोस्पेस (आय) प्रा. लि. ला पाठवलेल्या सन्मानपत्रात नमूद केले आहे.
सदर सन्मानपत्राचा सर्व्होकंट्रोल्स कंपनी विपणन विभागाचे श्रीनिवास एन. पी. आणि योजना व विपणन उप वरिष्ठ प्रबंधक विजय प्रभू यांनी नुकताच स्वीकार केला.