बेळगाव लाईव्ह: प्रभाग क्रमांक 42 चे भाजप नगरसेवक अभिजित जवळकर यांना रविवारी रात्री अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
मोबाईल टॉवर बसविण्याच्या वादातून भाग्यनगर येथे गेल्या गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि स्थानिक रहिवाशी रमेश पाटील यांच्यात वादावादी मारणारी घडली होती.
त्या घटने नंतर मारामारी करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले होते. मारहाण प्रकरणी पोलिसांनी भाग्यनगर येथील रमेश पाटील यांच्यासह दोघा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर नगरसेवक जवळकर इस्पितळात उपचार करून घेण्यासाठी दाखल झाले होते.
रविवारी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानका समोर आंदोलन केले होते त्यानंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी नगरसेवक जवळकर यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
टिळकवाडी पोलिसात आय पी सी 392 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रमेश पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत?
रमेश पाटील यांच्या विरोधात आय पी सी 506,394,307,504,147,143 ,148 अन्वये गुन्हा टिळकवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.