Sunday, April 21, 2024

/

युवकाच्या खुनाने हादरले गोजगा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : क्षुल्लक कारणावरून विळयाने पोटावर सपासप वार करून युवकाचा खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगा येथे घडली आहे.मारुती गुंडू नाईक वय 34 असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गोजगा येथील राजू बंडू नाईक वय 50 याने मारुती वर विळ्याने पोटावर वार केला त्यात मारुतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली आहे.

मारुती आणि राजू यांच्या घरातील महिला मधून यापूर्वी भांडण झाले होते शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मारुती याने राजू याला काय गल्लीत तुझी भांडण? असे विचारले असता दोघांचा वाद भांडणात परिवर्तित झाले त्यात राजू यांनी घरातील विळा आणून भर गल्लीत मारुतीवर हल्ला केला त्यात त्याचा अंत झाला आहे.Gojga muder

मयत मारुती याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील, असा परिवार आहे.घटनास्थळी डी सी पी स्नेहा आणि काकती पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून त्याला पकडण्यासाठी विशेष टीम गठण करण्यात आले आहे. या खुनाचे  नेमके कारण कोणते कारण आहे का याचा तपास करत आहेत.

मयत मारुती हा आंबेवाडी मंननूर ग्राम पंचायत माजी अध्यक्ष तालुका समिती युवा आघाडीचे चेतन पाटील यांचा जवळचा मित्र होता.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.