बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूर मध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा नसते.
अशात काही विद्यार्थ्यांना बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे अश्या परिस्थितीत या समस्येकडे राज्य परिवहन मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसी, डि सी गणेश राठोड यांनी सदर समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
येळ्ळूर गावाचा विस्तार मोठा असल्याने साहजिकच गावातून जवळजवळ 1000 शाळा कॉलेजेस चे विद्यार्थी रोज ये ज करत असतात. तसेंच सकाळी, 6:30,7:00, 7:30 , या वेळेत आरपीडी, गोगटे, आरएलएस, जी.एस.एस तसेच इतर शाळा कॉलेजेसना जाणारे विद्यार्थी आहेत.
तसेच 8:30, 9:00, 9:30,10:00, 10:30 या वेळेत मराठा मंडळ, ज्योती कॉलेज जैन कॉलेज,मजगाव आयटीआय कॉलेज आणि इतर शाळा कॉलेजेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी या बसेस वेळेत असणे सोयीस्कर गरजेचे आहे असेही परिवहन खात्याला दिलेल्या मागणीत के एस आर टी सी ने म्हटले आहे.
पंचायतीने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसी डी सी गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की येळ्ळूर गावासाठी वेळेवर बसेस सोडाव्यात यावे व गावातील विध्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर करावी
निवेदन देतेवेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे.उपस्थित होते. यावेळी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा कडू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.