Tuesday, May 7, 2024

/

चित्रकार मारुती पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

 belgaum

‘रंग रेषांचे सोबती’ – या जेष्ठ चित्रकार मारुती पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. १३.१०.२३ रोजी भांडारकर इंस्टिट्यूट, पुणे येथील अँफिथिएटर मधे होणार आहे.

जेष्ठ लोकप्रिय अभिनेते व चित्रकार, *पद्मश्री नाना पाटेकर* यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक *श्री. विजय कुवळेकर* अध्यक्षस्थान भूषवणार आहेत व जेष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. सर्वांना सस्नेह निमंत्रण करत आहेत मारुती पाटील यांच्या मुली- तेजस व बरखा.

मुळचे बेळगावचे जेष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचा जन्म १९४५ चा. बालपणापासूनच खेडेगावातील निसर्गरम्य जीवनातून निर्माण झालेली कलेची आवड त्यांना पुढे बेळगावच्या चित्रमंदिर मधे कै. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी या गुरुंच्या छत्र छायेत घेऊन गेली.Maruti patil

 belgaum

पुणे मुंबई च्या प्रसिद्ध चित्रकला महाविद्यालयांमध्धील शिक्षणानंतर
बराच काळ जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात अध्यापक
म्हणून नोकरी स्वीकारली ती केवळ चित्रकलेबद्दलच्या प्रेमामुळे, ओढीमुळे. जवळ जवळ चार दशके अध्यापना बरोबरच स्वतः चित्रनिर्मितीतून त्यांच्यातला चित्रकार त्यांनी जिवंत ठेवला.*रंग रेषांचे सोबती* या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या कलाप्रवासाचे अनुभव व त्यांची काही चित्र आपल्याला बघायला मिळतील.

• गायत्री तांबे- देशपांडे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.