सांस्कृतिक आणि संगीतिक दृष्ट्या बेळगाव महाराष्ट्राचे!
बेळगाव लाईव्ह: बेळगावचा पहिलाच युवक सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात अंतिम सर्वोत्कृष्ट बारा स्पर्धकामध्ये निवडला गेला त्या कार्यक्रमात त्याच्याशी संवाद साधताना मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी “सांस्कृतिकदृष्ट्या, संगीतिकदृष्ट्या बेळगावला महाराष्ट्रापासून विलग करता येणे शक्यच नाही” असे म्हणत मराठी बाणा बेळगाव वरचे प्रेम दाखवले आहे.
बेळगाव हिंडलगा गावचा सुपुत्र सागर चंदगडकर याची कलर्स मराठी वाहिनीवर “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात अंतिम सर्वोत्कृष्ट बारा स्पर्धकामध्ये निवडला गेला असून काल शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी परीक्षक गायक अवधूत गुप्ते, महेश काळे व निवेदिका रसिक सुनील यांच्या उपस्थितीत पहिली पार पडली.
सागर हा सीमाभागासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोवाड्यांचे कार्यक्रम व सीमावासीयांमध्ये सीमालढ्याचे स्फुरण निर्माण करणारे शाहीर शिवाजी चंदगडकर यांचा कनिष्ठ चिरंजीव असून त्याला हे बाळकडू वडिलांच्या पोवाड्यातून मिळाले, वडिलांच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमात सागर सहाय्यक (कोरस) गायकाची भूमिका निभावायचा, त्यातूनच त्याला गायनाची आवड निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास सुरु केला असे सागरने काल कार्यक्रमा दरम्यान अवधूत गुप्ते यांच्या समोर मनोगत व्यक्त केले.
सागरने कैलास खेर यांचे “सैय्या” हे सुफी गाणे सादर केले, याला अवधूत गुप्ते व महेश काळे यांनी भरभरून दाद दिली व तोंडभरून कौतुक केले.
सहा दिवसांपूर्वी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सागर हा कलर्स मराठीवरील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची पोष्ट फेसबुक टाकली होती व काल या कार्यक्रमाचा आनंद आपल्या घरच्या टीव्हीवर कुटुंबिया सोबत धनंजय पाटील घेत असताना त्यांनी गायक अवधूत गुप्ते यांनी बेळगाव आज भौगोलिक दृष्ट्या जरी कर्नाटकात असले तरी सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रात असल्याची दाद सागर देतानाच व्हिडिओ छायाचित्रीत केला व सागर गात असतानाचे फोटो टिपले होते.
आज दिवसभर विविध समाज माध्यमावर व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले व समितीप्रेमी मध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन बऱ्याच जणांनी सागरला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, बेळगाव लाईव्ह कडूनही सागरला खूप खूप शुभेच्छा!
Antral Kulkarni is from Belgaum she is also in this show