बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेत सुरू असलेल्या रंणकंदनावर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषद घेत या घटना क्रमावर बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कोणताही इरादा नाही असे मात्र महापौर व महापौरांनी जर राज्यपालांकडे तक्रार केली असेल त्यांना ती करू देत असे मत व्यक्त केले.
बेळगाव महापालिकेतील वाद आता थेट राज्यपालांपर्यंत पोहोचला असताना दुसरीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी महापौर शोभा सोमनाचे या मराठा आहेत आणि मराठ्यांवर अन्याय करत आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. ते म्हणाले की, महापौर निवडणुकीनंतर स्वतः दक्षिणच्या आमदाराने सोमनाचे या मराठा महापौर नाहीत तर भाजपच्या महापौर आहेत इथे कन्नड मराठी कोणताही संबंध नाही असे म्हटले होते. त्यामुळे त्यावेळीच भाषा आणि जातीचे राजकारण संपले आहे. त्यामुळे केवळ भाजप आणि काँग्रेस असे राजकारण सुरू असल्याचे म्हटले जाते. मात्र आता का ते जातीचे राजकारण आणू पाहत आहेत? असा प्रति प्रश्न करून जारकीहोळी यांनी दक्षिण आमदारांनीच मराठा समाजाच्या युवकांवर गुन्हे दाखल केले आहे. मराठा समाजाला त्रास दिला आहे, असा पलटवार केला. तसेच महापालिकेची बरखास्ती सर्वस्वी आमदार त्या आमदारांवर अवलंबून आहे. सभागृहाच्या सदस्यांनी म्हणजे नगरसेवकांनी त्यांच्या नादी लागता कामा नये असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यूपीएससी सारख्या केंद्रीय संस्थांना पत्र लिहिण्याचा महानगरपालिकेतील जो ठराव झाला तो ठराव कोणत्याही भ्रष्टाचाराची संबंधित नाही याशिवाय कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेला नाही किंवा कोणता मोठा असा गंभीर गुन्हा नाही असेही ते पुढे म्हणाले.
महानगरपालिकेने नगर विकास खात्याला लिहिलेल्या पत्रात केवळ आकड्याची चूक झालेली आहे.2023-24 रोजी 24- 25 अशी चूक झालेली आहे. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याशी संबंधित असलेला विषय आहे. याबाबतचे पत्र राज्य सरकारला लिहिण्याऐवजी दक्षिण आमदार अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याकरिता भेडसावण्याकरिता केंद्रीय संस्थांना पत्र लिहिण्याचा ठराव केलाय एका दलित दलित अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे त्याचा मी निषेध करतो असेही त्यांनी सांगितले.
नगर विकास खात्याला पाठवलेला त्या फाईलवर महापौरांची सही झालेली आहे की नाही याबाबत फाईल गहाळ झाल्याची पोलिसात तक्रारी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे आणि कायदा सल्ला घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
बेळगाव बेळगाव महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांनी या सर्वांच्या बाबतीत विचार करावा आम्ही महापालिकेत विरोधी पक्षात आहोत राज्यात आमचे सरकार असले तरी कामकाज कसे करावे याबाबत
सर्वांनी विचार करावा असे ते म्हणाले.