बेळगाव लाईव्ह :बेळगुंदीत (ता. बेळगाव) बकऱ्याच्या मटणाच्या नावाखाली जनावराचे मांस विक्री केली जात असल्याची धक्कादायक समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगुंदीत बेळगांव परिसरातील एकाने मटणा विक्रीचे दुकान घातले आहे. मंगळवारी सदर दुकानदाराने बेळगांव हून बेळगुंदीकडे बकऱ्यानी भरलेली रिक्षा आणतेवेळी बेळगुंदी गावाजवळ पलटी झाली.
त्यानंतर त्या रिक्षामध्ये जनावरांचे मांस असल्याचे ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी विक्रेत्याचे दुकान बंद केले असून त्याला २१ हजारांचा दंड केला आहे.
बेळगुंदीच्या चौकात हा मटण विक्रेता दोन वर्षांपासून मटन विक्री करत होता. मंगळवारी (ता.३) त्याने दुकान सुरू केले. काही ग्राहकांनी मटण देण्याची मागणी केली. त्यावेळी जनावराची मटन विकत असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यानी त्या विक्रेत्याला याच्याबद्दल जाब विचारला. त्यावेळी हे मास एका हॉटेल मध्ये देणार आहे असे सांगितले पण कोणत्या हॉटेल मध्ये देणार आहे हे सांगितले नाही.
त्यावेळी गोंधळाच्या स्थितीत दिसून आला.त्यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्या विक्रेत्याला दुकान बंद करण्यास भाग पाडले. बेळगुंदीत बकऱ्याचे मटण ४०० रुपयांना विक्री केल्याने मोठ्या प्रमाणात मटणाची विक्री होत होती..