Wednesday, April 17, 2024

/

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबणार कधी?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून शहरात अनेक ठिकाणी कुत्री माणसांना चावा घेतल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय परिसरात बिल भरण्यासाठी आलेल्या चार नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तसेच बाजूच्या कारवार स्थानकामध्येही तिघा जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.

रेल्वे स्थानकाच्या बस स्थानकात स्वच्छता असून या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
याआधीही बेळगाव शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई-बकरी यावरच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून वारंवार केली जात असतानाही जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने नको ती कारणे सांगून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

 belgaum
Street dogs
Street dogs

प्राणी दया संघटना मोकाट कुत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असेही बोलले जाते. असे असेल तर मोकाट कुत्र्यांबद्दल कणव असणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणारे दहशत याबद्दल काही वाटते का नाही? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

उच्छाद मांडणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्याला जंगल भागात सोडावे किंवा गावाबाहेर एखादे श्वान आश्रयस्थान स्थापून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी प्राणी दया संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे सोपवावी असे पर्याय मनपाचे हाती घ्यावे जेणेकरून मोकाट कुत्र्यांपासून शहर परिसर मुक्त होईल आणि प्राणी दया संघटनेचे इप्सित साध्य होईल असे विचार समोर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.