Wednesday, May 22, 2024

/

आमदारांनी केला रेल्वे, बस स्थानकाचा पाहणी दौरा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानक आवार आणि त्यासमोरील बस स्थानक आवारात पाहणी दौरा केला.

आमदार असिफ सेठ यांनी रेल्वे स्थानकावर व त्यासमोरील बस स्थानक आवारातील आपल्या पाहणी दौऱ्या दरम्यान तेथील एकंदर परिस्थिती आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

त्याचप्रमाणे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी या दोन्ही स्थानकांच्या ठिकाणी आणखी कोणत्या सुधारणा करावयास हव्यात याबद्दलची माहिती घेण्याबरोबरच त्या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

 belgaum

यावेळी प्रवाशांसह तेथील दुकानदार आणि ऑटो रिक्षा चालकांनी आमदारांसमोर आपल्या तक्रारी व समस्या मांडल्या. यावेळी ऑटो रिक्षा चालकांनी रेल्वे स्थानक आवारामध्ये आपल्याला रिक्षा थांबविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

त्याचप्रमाणे प्रवासी वर्गाने बेळगाव दक्षिण भागासाठी असलेली शहरी बससेवा रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानका मार्गे करावी अशी मागणी केली. सर्वांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले.Bus stand

गेल्या काही दिवसापासून गोवा बस स्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे सध्या या ठिकाणी कर्नाटक परिवहन मंडळाचा बस बाबत माहिती देण्यासाठी एकही अधिकारी किंवा कर्मचारी तैनात नसल्याने सदर बस स्थानकावर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.

खानापूर कडे जाणाऱ्या बहुतांश बसेस व्हाया गोगटे सर्कल मधून जात आहेत त्यामुळे बस थांबल्याने परिणामी गोगटे सर्कल वर रहदारी समस्या,रोडवर अडथळे निर्माण होत आहे. यासाठी खानापूर बसेसना गोवा बस स्थानकावर थांबवावी अशी मागणी आहे या पाश्र्वभूमीवर आमदार सेठ यांनी या गोवा बस स्थानकाची पाहणी केली आहे.

 

गेल्या डिसेंबर 2021 मध्ये जवळपास एक कोटी 80 लाख खर्चून या बस स्थानकाचे लोकार्पण मुख्यमंत्री बोममई यांनी केले होते मात्र आता याची दुरवस्था झाली आहे या आशयाच्या बातम्या अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या बेळगाव लाईव्हने या संदर्भात वृत्त प्रसारित केले होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.