Saturday, July 27, 2024

/

पतसंस्थांचे डिसें.2, 3 रोजी नवी दिल्ली येथे अधिवेशन -डॉ. होसमठ

 belgaum

बेळगाव लाईव्ह:पतसंस्था स्वत:च्या विशेष सेवा देऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय क्षेत्राला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु पतसंस्थांनाही अनेक समस्या भेडसावत असून, या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्यासाठी नवी दिल्ली येथे येत्या दि. 2 आणि 3 डिसेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. यासाठी कर्नाटकातून ‘चलो दिल्ली’ अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रसंचालक व समन्वयक डॉ. संजय होसमठ यांनी दिली.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. होसमठ म्हणाले की, सर्व पतसंस्थांना ठेव विम्याची सुविधा मिळावी, आयकर कायद्यातून सूट मिळावी, नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, सोसायट्यांना डिजिटल व्यवसाय करता यावा यासाठी कायदे करावेत, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बँकांच्या मॉडेलवर क्रेडिट सोसायट्यांसाठीही सिबिल स्कोर प्रणाली लागू करावी.

कर्जवसुलीसाठी कायद्यांतर्गत तरतूद करावी. सरकारी संस्थांमध्ये सुरक्षा गुंतवणुकीला परवानगी द्यावी. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बँकांना देण्यात येणाऱ्या मुद्रा कर्ज योजनांमध्ये पतसंस्थांनाही सहभाग द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार आहे.

अलीकडच्या काळात कांही सोसायट्यांनी आर्थिक व्यवहारात केलेल्या चुकांमुळे सहकार यंत्रणा धोक्यात आली आहे. अशा घटना घडू नयेत. त्यासाठी विशिष्ट आणि स्पष्ट कायदा बनवला गेला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारला यापूर्वीच पत्र लिहिले आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत पुरेसा तोडगा काढता आलेला नाही, पतसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या दि. 2 आणि 3 डिसेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे.

या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमिता शाह आदी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात सर्व विषयांवर चर्चा होणार आहे तसेच या अधिवेशनासाठी कर्नाटकातून ‘चलो दिल्ली’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय होसमठ यांनी दिली. पत्रकार परिषदेस महामंडळाचे संचालक तमन्ना केंचरेड्डी, सहकार भारतीयचे सुधाकर महिंद्रकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.