बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात पूर्वीपासूनच दोन बस स्थानक प्रचलित आहेत एकीकडे मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट झाला असताना दुसरीकडे बेळगाव शहराच्या पाऊलखुणा जपणारे सावंतवाडी गोवा म्हणजेच रेल्वे बस स्थानकाची मात्र पार दुर्दशा झाली आहे.
या गोवा बस स्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे सध्या या ठिकाणी कर्नाटक परिवहन मंडळाचा बस बाबत माहिती देण्यासाठी एकही अधिकारी किंवा कर्मचारी तैनात नसल्याने सदर बस स्थानकावर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.
खानापूर कडे जाणाऱ्या बहुतांश बसेस व्हाया गोगटे सर्कल मधून जात आहेत त्यामुळे बस थांबल्याने परिणामी गोगटे सर्कल वर रहदारी समस्या,रोडवर अडथळे निर्माण होत आहे. यासाठी खानापूर बसेसना गोवा बस स्थानकावर थांबवावी अशी मागणी बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज यांनी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे केली आहे.
गेल्या डिसेंबर 2021 मध्ये जवळपास एक कोटी 80 लाख खर्चून या बस स्थानकाचे लोकार्पण मुख्यमंत्री बोममई यांनी केले होते मात्र आता याची दुरवस्था झाली आहे.
सदर बस स्थानक छावणी सीमा परिषदेच्या व्याप्ती मध्ये येते दररोज सकाळीच स्वच्छता आणि साफसफाई देखील या ठिकाणी होत नसल्याने येणाऱ्या तुरळक साठी थांबलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मागील एक वर्षांपूर्वी तात्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या सावंतवाडी बस स्थानकाचे लोकार्पण केलं होतं कोट्यावधी रुपये खर्चून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून याकामी खर्च करण्यात आले होते मात्र सध्याच्या घडीला या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. उद्घाटन झालेल्या केवळ दीड वर्षातचं या बस स्थानकाची अशी अवस्था झाल्याने स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जा वर टीका होताना दिसत आहे.
नुकताच भारताच्या राष्ट्रपतींनी बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेला पुरस्कार दिला होता मात्र सावंतवाडी म्हणजेच गोवा बस स्थानकाची दुरावस्था पाहिली असता सदर बस स्थानक गेल्या एक वर्षात स्मार्ट सिटी मधून विकसित झाले होते नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.