Saturday, July 27, 2024

/

पाच नंबर शाळेचे माजी विद्यार्थी संघटना आक्रमक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या सुरुवातीला असलेल्या चव्हाट गल्लीतील मराठी शाळेची जागा वाचवण्यासाठी ॲड. अमर येळळूरकर यांच्या नेतृत्वाखालील माजी विद्यार्थी संघटनेने प्रयत्न चालवले आहेत.

नियोजित वेळेआधीच सुनावणी घेणाऱ्या बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सदर सुनावणीची नोंद घेण्यास माजी विद्यार्थी संघटना यशस्वी झाली आहे.

ॲड अमर येळळूरकर यांनी दिलेल्या माहितनुसार बाल हक्क आयोगाकडे चव्हाट गल्लीच्या 5 नंबर शाळेच्या वतीने कैफियत दाखल करण्यात आली होती त्याची सुनावणी बाल हक्क न्याय लवादा कडे बुधवारी दुपारी 2:30 वाजता नियोजित होती त्यानुसार दुपारी होणाऱ्या सुनावणीचा समन्स देखील जारी करण्यात आला होता. समन्स दुपारीच्या सुनावणीचा असताना देखील बाल हक्क आयोगाने कोणतेही पूर्व कल्पना न देता बुधवारी सकाळी दहा वाजता या याचिकेची सुनावणी चालू केली या केस मध्ये याचिका कर्ते गैर हजर दाखवून केस पुढे ढकलली होती .

बुधवारी अडीच वाजता बाल हक्क लवादा समोर सुनावणीची नोटीस दिली असताना सकाळीच सदर सुनावणी झाल्याची बाब आम्हाला डी सी ऑफिस मध्ये गेल्यावर कळली त्या गोष्टीचा जाब जिल्हा पंचायत मधील बाल हक्क आयोगाच्या बैठकीत विचारला, त्यावर बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष नागन्नागौडा यांनी लवाद सदस्या मंजुळा यांना यांना आमची कैफियत ऐकण्यास सांगितली त्यांनी आमचा आक्षेप नोंदवून घेतला असे येळळूरकर यांनी सांगितले.Marathi school

पाच नंबर मराठी शाळा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने बाल हक्क आयोगाला जाब विचारला त्यावेळी बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत आमच्या तक्रारीची नोंद घेत पुढची तारीख दिली.

या याचिकेत जो गैरकारभार झालेला आहे वीरशैव को ऑप सोसायटीने जागा खरेदी केलेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी चव्हाट गल्लीतील माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य अमृत जाधव
दीपक किल्लेकर रवी नाईक उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.