Monday, November 18, 2024

/

बेळगाव ते पंढरपूर थेट रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहर तालुक्यातील वारकरी मंडळींची विशेष करून वयोवृद्ध भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी समस्त बेळगाव तालुक्याच्यावतीने श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी आणि निलजी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याकडे केली आहे.

निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन कडाडी यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित कडाडी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना ॲड. लक्ष्मण यल्लाप्पा पाटील म्हणाले की, श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि श्रीराम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ आणि समस्त निलजी ग्रामस्थ तसेच तालुकावासियांतर्फे बेळगाव ते पंढरपूर ही पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. बेळगाव ते पंढरपूर अशी पॅसेंजर रेल्वे सेवा 2019 पूर्वी म्हणजे कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ होण्यापूर्वी सुरळीत सुरू होती. त्यावेळी दररोज दुपारी 2:30 वाजता आणि सायंकाळी 4:30 वाजता अशी दिवसातून दोन वेळा ही रेल्वे नियमित चालू होती. मात्र कोरोना काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली.Pandharpur

कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर बेळगाव ते पंढरपूर वगळता आतापर्यंत सर्व रेल्वे सेवा पूर्ववत सुरळीत सुरू झाल्या आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारी बेळगाव -पंढरपूर रेल्वे मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेष करून वयस्क भक्तमंडळींची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना सध्या रेल्वेने जावयाचे झाल्यास मिरजेपर्यंत जाऊन तेथून पंढरपुराला जावे लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बेळगाव ते पंढरपूर थेट पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाल्यास समस्त वारकऱ्यांसह वडीलधारी वयस्कर भक्त मंडळींची अतिशय चांगली सोय होणार आहे.

तेव्हा ही रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असे श्रीराम मंदिर निलजीचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी ट्रस्टचे इतर सदस्य आणि निलजी गावातील नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.