Saturday, December 28, 2024

/

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटल्याचा निकाल बुधवारी शक्य

 belgaum

बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणार्‍या मराठी जनतेवर अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आहे. या सात खटल्यातील एक खटल्याचा बुधवारी 18 रोजी निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे.

येळ्ळूर खटल्याप्रकरणी गेल्या मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीला म. ए. समितीचे सर्व 26 संशयित उपस्थित होते. न्यायालयात त्यांचा जवाब नोंदवण्यात आला. याआधी न्यायालयाने फिर्यादी एसीपी नारायण बरमणी सुनावणीला वारंवार गैरहजर असल्यामुळे खटल्यातून नाव काढून टाकण्याचा आदेश दिला होता.

गेल्या 10 रोजी झालेल्या सुनावणीत सर्व संशयितांचे जवाब नोंदवण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला हा महत्वाचा खटला निकालाकडे आला आहे. बुधवार 18 ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.Dasra advt

जुलै 2014 मध्ये जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात येळळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटवला. या कृतीला ग्रामस्थांनी शांततेत विरोध केला होता. पण पोलिसांनी अमानुष मारहाण केली. आणि लोकांवर गुन्हे नोंद केले. एकूण 222 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून यापैकी 26 जणांच्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे बुधवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.Dasra

येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर आणि अ‍ॅड. शाम पाटील हे काम पाहात आहे. बुधवारी दुपारी निकाल समजणार आहे.Dasra advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.