बेळगाव लाईव्ह :महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (तारिख 7) रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीत एकूण सहा विषय आहेत. त्यामध्ये स्थायी समितीच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभा करणे,
बुडाकडील वसाहतींचे हस्तांतरण करणे आदी विषयांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यातील स्थायी समिती सभेत आमदार राजू सेट यांनी विरोधी गटाची बाजू जोरकसपणे मांडली होती
सर्व नगरसेवकांना मंगळवारी रात्री नोटीस पाठवण्यात आली असून शनिवारी बैठक होणार आहे.