Sunday, December 22, 2024

/

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक कर्नाटकात दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्नाटकातील 195 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणीसाठी दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसौध येथे महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.

केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकात 10 सदस्य आहेत आणि ते सलग 4 दिवस राज्यातील स्थानिक अधिकार्‍यांसह दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव अजित कुमार साहू आणि कृषी आयुक्त पाटील येलगौडा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली पहिली टीम बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाडला भेट देणार आहे.

बैठकीत केंद्रीय पथकाला राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली.केंद्राकडे 6 हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत.

अपील करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे, कृषी मंत्री चेलुवरायस्वामी, सहकार मंत्री केएन राजन्ना, फलोत्पादन मंत्री एस एस मल्लिकार्जुन या बैठकीत सहभागी झाले आहेत.

दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर केंद्रीय पथकातील अधिकारी राज्य सरकारच्या अधिकार्‍यांसोबत दुसरी बैठक घेणार आहेत. यानंतर 9 ऑक्टोबरला नवी दिल्लीत जाऊन अहवाल सादर करणार आहेत.

11 रोजी अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण सभा

बेळगाव :जिल्हास्तरीय अनुसूचित जाती-अनुसूचित वर्ग तक्रार निवारण बैठक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व विभागीय प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती/जमातींच्या नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि समस्यावर चर्चा करण्यासाठी यावे, अशी विनंती समाज कल्याण विभागाचे सहसंचालक लक्ष्मण बबली यांनी निवेदनात केली आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.