Saturday, November 9, 2024

/

काळ्या दिनासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : एक नोव्हेंबर काळ्यादिनी बेळगाव सह सीमा भागात होणाऱ्या कडकडीत हरताळ दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध नेते मंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर व विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टंडळाने सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराजे देसाई,खासदार सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने,
शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना बेळगावात होणाऱ्या जाहीर सभेला निमंत्रण देण्यात आले.Khot

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील संबंधित नेत्यांना काळ्या दिनासाठी मराठा मंदिर येथील सभेसाठी निमंत्रण दिले असता त्यांनी आपला पूर्व नियोजित दौरा पाहून वेळेचे नियोजन करून बेळगावला येण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी  महनिय व्यक्तींनी आस्थापूर्वक चौकशी करून सत्य परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सागर पाटील कपिल भोसले उदय पाटील अमित जाधव आनंद पाटील शिवराज सावंत रुपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.