बेळगाव लाईव्ह :नवी दिल्लीच्या स्वरूपात देशातील 12 व्या शहराला प्रवासी विमान सेवा सुरू करण्याद्वारे गेल्या 5 ऑक्टोबर 2023 बेळगाव शहराने हवाई वाहतुकीच्या इतिहासात नवा मैलाचा दगड गाठला आहे.
इंडिगो एअरलाइन्सने बेळगाव विमानतळ ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या नवी दिल्ली विमानसेवेचा शुभारंभ केला. या शुभारंभाचे औचित्य साधून विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचे (आयएलएस) देखील अनावरण करण्यात आले.
बेळगाव विमानतळावरून सध्या इंडिगो आणि स्टार एअर या दोन विमान कंपन्यांच्या सेवा सुरू आहेत. स्टार एअरलाइन्सकडून बेळगाव येथून अहमदाबाद, इंदोर, जोधपुर, मुंबई, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर आणि अहमदाबाद मार्गे भुज अशा थेट आठ विमान सेवा उपलब्ध आहेत.
दुसरीकडे इंडिगो एअरलाइन्स बेळगाव येथून दररोज नवी दिल्ली, बेंगलोर (दोन फेऱ्या) आणि हैदराबाद या शहरांना विमान सेवा देत आहे. विमान कंपन्यांचे हिवाळी वेळापत्रक येत्या 29 ऑक्टोबर पासून अमलात येत आहे. तेंव्हा इंडिगो आणि स्टार एअर या दोन्ही कंपन्या पुण्याच्या अतिरिक्त विमानसेवेची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही विमान सेवा सुरू झाल्यास बेळगावला जोडले जाणारे पुणे हे 13 वे शहर ठरणार आहे.
बेळगावच्या वाढत्या विमान सेवेच्या जाळ्यामुळे प्रवाशांची तर चांगली सोय होणारच आहे, या खेरीज ही बाब हवाई वाहतूक उद्योगातील बेळगावचे वाढते महत्त्व सुचित करणारी ठरणार आहे.
एकंदर नवनव्या मार्गांवर विमान सेवा सुरू करण्याबरोबरच आयएलएस सारखे प्रगत प्रणाली अंमलात आणण्याद्वारे बेळगाव विमानतळ प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाची भूमिका बजावण्यास सिद्ध झाले आहे.
When Belgaum to Nasik flight will start,which is discontinued, hope to start the same at the earliest.ok