बेळगाव लाईव्ह विशेष:बेळगाव live म्हणजे लाखो बेळगावकर नागरिकांचा आवाज. हा आवाज पोचलाय साता समुद्रापार…. सलग 27 तास बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या महाकव्हरेज च्या माध्यमातून…. ही बेळगाव live ची गरुड भरारी, बेळगावची महती सर्वदूर पसरवण्यासाठी,बेळगावची कीर्ती जगभर सांगण्याण्यासाठी आणि बेळगावचा डंका जगभर गर्जवण्यासाठी!
बेळगावच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. मुंबई आणि पुण्यानंतर फक्त बेळगावांतच अशी मिरवणूक होते आणि ती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल होतात. जे दाखल होतात ते प्रत्यक्ष डोळ्यांनी ही मिरवणूक पाहू शकतात .
मात्र ज्यांना गणेशोत्सवासाठी बेळगावला येता येत नाही त्यांचे काय? अशांसाठी लाईव्ह कव्हरेज च्या माध्यमांतून बेळगाव live ने सातत्याने सत्ताव्वीस तास लाईव्ह मिरवणूक दाखवण्याचा उद्देश हाती घेतला. याला तांत्रिक टीमची मदत लाभली आणि कोणताही खंड न पडता सलग 27 तास बेळगावची सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक साऱ्यांनाच पाहता आली.
बेळगावचा गणेश उत्सव जगभरात पोचवण्यासाठी मागील वर्षी च्या विसर्जन मिरवणुकीपासून आम्ही सतत live कव्हरेज देत आहोत त्याचे नेहमीच बेळगावकरातून स्वागत झाले आहे जगातल्या अनेक देशात हे live प्रक्षेपण बघून लोकांनी हजारो च्या संख्येनी प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे ही गणेश उत्सव विसर्जनाची थेट प्रक्षेपणाची परंपरा कायम ठेवण्यात सलग दुसऱ्या वर्षीही बेळगाव लाईव्ह यशस्वी झाले आहे.यावर्षीही लाखो प्रेक्षकांनी लाईव्ह च्या माध्यमातून गणेश विसर्जन पाहिले आहे.
आजारपणामुळे, अधूपणामुळे , काही कामानिमित्त घराघरात अडकलेले नागरिक असो, परीक्षा किंवा इतर कारणांमुळे प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभाग न घेता येणारे बेळगाव आणि परिसरातील गणेश भक्त असोत किंवा देश आणि विविध परदेशात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अडकलेले बेळगावकर नागरिक असोत या साऱ्यांसाठी हे लाईव्ह कव्हरेज घरबसल्या बाप्पाचे दर्शन घडवणारे ठरले.
हजारोंच्या विविध प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्याचे प्रत्यंतर आले आणि बेळगाव लाईव्ह चा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थ ठरला. सुदान, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातून ही मिरवणूक पाहून बेळगाव लाईव्ह चे आभार मानणाऱ्या असंख्य कॉमेंटनी बेळगाव लाईव्ह वर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि यातूनच साध्य झाले मुख्य उद्दिष्ट.
या मिरवणुकीला विश्लेषक म्हणून लाभलेले साहित्यिक गुणवंत पाटील ,राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य अभियंता सेलचे अध्यक्ष अमित देसाई असोत,जेष्ठ पत्रकार अनंत लाड, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील असोत किंवा नेक्स्ट मराठीचे सल्लागार संपादक प्रसाद सु प्रभू, पत्रकार यल्लापा हार्जी, उद्योजक रमेशराव रायजादे असोत या साऱ्यांनीच बेळगाव परिसर,बेळगावची परंपरा बेळगावचे क्रीडासाहित्य क्षेत्र, रूढी ,शेती गाजलेले पैलवान, धर्म यांचा आढावा घेत विधायक गणेशोत्सवाची परंपरा, बेळगावचा इतिहास आणि बेळगावची एकंदर वाटचाल, गणेशोत्सव आणि त्यातून घडलेले कार्यकर्ते, साध्या गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ते राजकीय पक्षांचा सदस्य, मोठा समाजसेवक अशा अनेक गोष्टींची नोंद या लाईव्ह मध्ये घेतली आणि यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. विशेषत्वाने चर्चा झाली ती पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव नेमका कसा असावा या संदर्भात. गणेश मूर्तीची उंची असो, गणेश मंडपाची उंची असो ,रहदारीची कोंडी असो… मूर्ती शेड्यूच्या मातीची की प्लास्टर ऑफ पॅरिसची, वाद्यांचा गजर पारंपारिक की डॉल्बीचा या साऱ्या गोष्टींना चर्चेच्या माध्यमातून बळ मिळाले.
Live साठी विशेष आभार (live युनिट कॅमेरामन)
प्रो लिंक व्हिज्युअल मीडिया
प्रतीक नाईक
विनायक होसूरकर
किशोर, अमन, आदर्श, संतोष बाचीकर,
विनायक कोकितकर
आकाश धामणेकर
विनायक हावळ
संदीप गावडे
बसू ,शिवराज, अनिश,
संजय चौगुले
नागेश कालिंग
स्वप्नील जाधव
विशेष सहकार्य : विकास कलघटगी (मध्यवर्ती गणेश महामंडळ)
सुनील जाधव( लोकमान्य गणेश महामंडळ)