बेळगाव लाईव्ह :समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना मुलांच्या रक्षणाचीही मोठी जबाबदारी पोलीस खात्यावर आहे. त्यांच्या समस्या, बालगुन्हेगारीची प्रकरणे हाताळताना बालमनाचा अभ्यास करून संवेदनशील राहून काम करा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. पी. मुरली मोहन रेड्डी यांनी केले.
पोलीस भवनात बालकल्याण पोलीस अधिकार्यांसाठी सोमवारी जिल्हा बाल संरक्षण विभाग, कर्नाटक राज्य पोलीसांकडून कायदा प्रशिक्षण आणि एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील होते.
न्या. मुरुली मोहन रेड्डी म्हणाले पोलिसांची सेवा आजच्या समाजासाठी अनमोल आहे. समाजाचे आरोग्य जपण्यासाठी पोलिसांनी काम केले पाहिजे. पोलीस अधिकार्यांनी आरोपांची, विशेषत: मुलांचे संरक्षण करण्यासाठी कसून चौकशी करावी हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारांना समजून घेऊन शिक्षा झाली पाहिजे.
अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख एम. वेणुगोपाल, महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक नागराज आर., जिल्हा बाल संरक्षण विभागाचे जिल्हा अधिकारी महांतेश भजंत्री, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लुर्ड मेरी
प्रमुख पाहुणे होते.
कोप्पळ बालरक्षण प्रकल्पाचे समन्वयक हरीश जोगी, हावेरी जिल्हा पोलीस विभागाचे अधिकारी मल्लाप्पा जालगार मार्गदर्शक होते.