बेळगाव लाईव्ह:दिलेल्या निर्धारित अवधीत उद्दिष्ट पूर्ण न केल्याबद्दल बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीला महापालिका आयुक्त जगदीश दुडगुंटी यांनी 21 कोटी 46 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याद्वारे एकच खळबळ उडवून दिली आहे.
बेळगाव शहराला 24 तास पिण्याचे पाणी पुरवण्यासह इतर कामांसाठी पाणी पुरवण्याच्या जबाबदारीचे 2021 ते 2025 अशा पाच वर्षाच्या कालावधीचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे.
तथापि तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी शेकडा 60 टक्के कामही पूर्ण झालेले आहे. या पद्धतीने सोपवलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसल्याबद्दल एल अँड टी कंपनीला 21 कोटी 46 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
एवढेच न करता सदर कंपनीला गेल्या 12 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज गुरुवारी आपल्या कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली.