Saturday, July 27, 2024

/

ट्रेंड बदलला पण, उद्देश हरपू नये!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:ब्रिटिश राजवटीविरोधात विखुरलेल्या मराठी मनांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यातून समाज प्रबोधन करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1894 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार सुरू केला. या घटनेनंतर अवघ्या 11 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांनीच बेळगावात 1905 साली झेंडा चौकात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात केली.

बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला हे ऐतिहासिक महत्व असून पुण्यानंतर बेळगावात साजरा होणारा गणेशोत्सव आपली वेगळी ओळख दर्शवत आला आहे. आता या गणेशोत्सवात अनेक बदल झाला असला तरी या सणाने आपले पावित्र्य आणि मर्‍हाटमोळे वातावरण कायम टिकवून ठेवले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव हे चळवळींचे मुख्य केंद्र होते. पुण्या, मुंबईनंतर बेळगावात महत्वाच्या घटना घडत असत. अनेक क्रांतीकारकही बेळगावात होऊन गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला देशप्रेमाचे स्वरूप आल्यानंतर बेळगावभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला.Ganesh fest bgm

प्रत्येक गल्लीत सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप सजू लागले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भुमिका महत्वाची राहिली आहे. सीमाप्रश्न अद्याप सुटला नसला तरी बेळगावातील मराठीपण जपण्यात या सणाचा वाटा मोठा आहे.11 jamboti

झेंडा चौकात एका कट्ट्यावर सुरू झालेल्या सणाचे स्वरूप आता पालटून गेले आहे. सध्या गणेशोत्सवात झगमगाट दिसून येतो. गणेश चतुर्थीच्या आधी दोन महिन्यांपासूनच गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असते. मंडप सजवणे, मूर्ती ठरवणे, महाप्रसाद, गणहोम, धार्मिक विधी, सत्कार, प्रबोधनात्मक कार्यक्रम अशी कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते.11 yuvraj

गणेशोत्सवाचे स्वरूप प्रचंड बदलले असले तरी या सणाला सामाजिक कार्याची जोडे आवश्यक आहे. आज शहरात 378 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी अनेक मंडळांनी शंभर वर्षे, पंचाहत्तर वर्षे, पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे समाज प्रबोधनाची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. केवळ महाप्रसाद आणि मोठ्या मिरवणुका न करता या मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रमांची आखणी करावी लागणार आहे. रक्तदान शिबिरे, आपल्या गल्लीतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत, गल्लीतील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, व्याख्यानांचे आयोजन असा प्रकारे विधायक गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो.11 Rohit

सुरवातीला हलगी आणि लेझीमच्या तालावर गणरायाचे आगमन आणि विसर्जन होत होते. आता मात्र ढोल, ताशांचा कडकडाट असतो. विसर्जनाला तर डॉब्लीचा दणदणाट असतो. मिरवणूक तब्बल अठरा ते 20 तास चालते. त्यामुळे गणेशोत्सव मोठा झाला तरी विधायकता लोप पावणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.11 Bharat

शहरात नदी, समुद्र असा पाण्याचा मोठा स्रोत नसल्यामुळे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आपोआप आले आहेत. तरीही काही जण उंच मूर्तीसाठी खटाटोप करतात. पण, काही वर्षांपूर्वी उंच मूर्ती आणि पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. काही जण कायमचे अधू बनले आहेत. त्यामुळे बुद्धीदात्याच्या सणात आपणच विघ्न आणता कामा नये. शहरातील विसर्जन तलावांत चांगल्या प्रकारे विसर्जन होईल, इतक्याच उंचीची मूर्ती प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे.11 maratha bank

सध्या सणाचे व्यावसायिकरण झाले आहे. अनेक चमको नेते या सणाच्या माध्यमातून आपली छबी लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मंडळांना आपल्या बाजुने वळवण्यासाठी पैशांचा वापर करतात. पण, लोकांनी कोणासोबत राहायचे, याची बुद्धी गणरायाच देणार आहे, याचे भान त्यांना दिसून येत नाही.11 rm

गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असले तरी, मूळ उद्देश हरवणार नाही, याची काळजी आता प्रत्येकाने घ्यावी लागणार आहे. परकीय शक्तीविरोधात एकवटण्यासाठी सुरू झालेल्या या सणामुळे पुन्हा एकदा एकत्रित येवून अन्यायाविरोधात, हक्कांसाठी लढण्याचे बळ कमवावे लागणार आहे. इतकी सुबुद्धी गणराय आम्हा सर्वांना देईल, इतकीच अपेक्षा!11 shivaji11 vaishali

11 kiran jadhav

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.