बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात रेडिओ एफएम केंद्र आणि वाहिन्या स्थापन कराव्यात, अशी विनंती राज्यसभा सदस्य खासदार इरण्णा कडाडी यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली येथे मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने हे निवेदन मी आपल्याला देत आहे. आमची ही मागणी मान्य करावी अशी विनंती खासदार कडाडी यांनी त्यांना केली.
त्याचप्रमाणे कर्नाटकची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाणारे बेळगाव हे उत्तर कर्नाटकातील एक प्रमुख शहर आहे. या शहराला मोठे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. त्यामुळे रेडिओ एफएम केंद्र आणि वाहिन्यासाठी थोडक्यात प्रसारण सेवांच्या विस्तारासाठी बेळगाव हे आदर्श स्थान आहे.
तुमच्या पाठिंबाने ही मागणी पूर्ण होऊन बेळगावातील रहिवाशांचे जीवन समृद्ध करण्याच्या आणि शहराच्या सांस्कृतिक व आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वासही इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केला.
निवेदनाचा स्वीकार करून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना सखोल परीक्षण करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.