बेळगाव लाईव्ह :द पुना ज्यूईस्ट स्कूल्स सोसायटीच्या सेंटपॉल हायस्कूल बेळगावतर्फे येत्या दि. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी ‘क्रोनोस-2023’ या सांस्कृतिक व साहित्यिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त माहिती देण्यात आली. क्रोनोस हा आमचा सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो त्यानुसार यंदाही येत्या 30 व 31 ऑक्टोबर 2023 रोजी क्रोनोसच्या नवव्या आवृत्तीचे सेंट पॉल्स शाळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव फक्त सेंट पॉल्स हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून या महोत्सवाद्वारे आम्ही सर्व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
या क्रोनोस -2023 महोत्सवासाठी 30 ते 35 शाळांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेळगावातील सर्व शाळांसह गोवा आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश असून या सर्व शाळांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत.
सेंटपॉल्स हायस्कूलने यापूर्वी फादर एडी फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
आता क्रोनोसद्वारे सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देत आहोत असे स्पष्ट करून तेंव्हा क्रोनोस 2023 या मेळाव्याच्या स्वरूपातील व्यासपीठाचा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून आपली प्रतिभा दाखवून द्यावी, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
https://x.com/belgaumlive/status/1705143835590865274?s=20