बेळगाव लाईव्ह: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य इंजिनिअर सेलच्या मार्फत बेळगाव सहज सीमा भागातील सुशिक्षित युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनीयर सेल हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी त्याची व्याप्ती आणि सीमा भागासाठी वाढवली आहे आणि त्याच माध्यमातून बेळगावच्या सुशिक्षित युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित देसाई यांनी केले.
जुने बेळगाव येथील नरवीर व्यायाम शाळेच्या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने अमित देसाई यांचा सत्कार करण्यात आला त्या सत्काराला उत्तर देतेवेळी ते बोलत होते.
गणेश उत्सवाच्या निमित्ताने जुने बेळगाव मधील लक्ष्मी गल्लीतील नरवीर गणेश मंडळाच्या गणेश महाआरती अमित देसाई यांनी सहभाग घेतला होता.
बेळगाव लाईव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी,मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक श्री बाबासाहेब भेकणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सक्रिय नेते किरण हुद्दार यांचाही सत्कार करण्यात आला.
नरवीर तानाजी व्यायाम शाळेच्या माध्यमातून युवकांनी व्यसनमुक्त व्हावा आणि व्यायामाकडे वळावे आपले शरीर सदृढ करून घ्यावे. या शिवाय सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून गावासाठी विधायक उपक्रम राबवावेत असे आवाहन प्रकाश बेळगोजी यांनी केले. तर जितेंद्र चौगुले यांनी देखील युवकांना मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रम प्रसंगीअध्यक्ष लक्ष्मीकांत सुतार उपाध्यक्ष प्रशांत सुतार, जितेंद्र चौगुले, राहुल भोसले ,सरवेश भरमुचे रवी पाळेकर प्रसाद सालगुडे योगेश धामणेकर सौरभ टपाले सुनिल टपाले मातेश सालगुडे आदी उपस्थित होते.सुरुवातीला संतोष शिवनगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जितेंद्र चौगुले यांनी आभार मानले.