Sunday, May 5, 2024

/

महामंडळासोबत मनपा आयुक्ताची पायपीट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शनिवारी पाच दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर बेळगाव महापालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशी रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची प्रशासनाकडून करण्यात येणारी तयारी सहाव्या दिवशी पासून जोरदारपणे चालवली आहे.

रविवारी सकाळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मध्यवर्ती गणेश महामंडळासोबत मिरवणूक मार्गाची पायपीट करत पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. सुरुवातीला त्यांनी
कपिल तीर्थ येथील नवीन आणि जुन्या तलावाला भेट देत पाहणी करून दोन्ही तलावांवर अधिकाऱ्यांना योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

जनतेत मिसळल्याशिवाय आणि गाव फिरल्याशिवाय गावच्या समस्या समजत नाहीत ग्राउंड रियालिटी कळत नाही नेमकं हेच धोरण अवलंबत मनपा आयुक्तांनी बेळगाव शहराची पायपीट केली आणि विसर्जन मार्गावरील समस्या समजावून घेतल्या. गेल्या दोन महिन्यात मनपा आयुक्तांनी पहाटेची कचरा पहाणीची धडक मोहीम राबवत स्वच्छता कामगारांना वटणीवर आणले आहे याशिवाय कामचुकारू अधिकाऱ्यांना नोटीस देत आपला कर्तव्यदक्षपणा दाखवून दिला होता. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश उत्सवा संदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर त्यांच्या सूचनांचे पालन करत मनपायुक्तांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या मागण्या मान्य करत तात्काळ अमलबजावणी करत आहेत.

 belgaum

रविवारी दुपारी मध्यवर्ती गणेश महामंडळ अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि सचिव महादेव पाटील यांच्यासह शहरात केलेल्या पायपिट दरम्यान मनपायुक्तांनी संपूर्ण मिरवणूक मार्गावर रस्त्यावर एकही दगड आणि इमारत बांधकामाचे साहित्य दिसता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यावी तसेच मिरवणुकीच्या मुख्य मार्ग यासह समांतर रस्त्यावर हायमास्ट,बल्ब फ्लड लाईट ची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मनपांच्या अभियंत्यांना दिल्या.Corporation commissinor

गणेश भक्तांसाठी चौका चौकात पाणपोईची सोय, व्यवस्था फिरती शौचालय तैनात करा आणि अश्या सूचना करत अग्निशामक दल आणि ॲम्बुलन्स थांबण्याच्या जागा देखील निश्चित करून दिल्या. याशिवाय धर्मवीर संभाजी चौकात प्रेक्षक गॅलरी उभी केली जाणार आहे. मुख्य गणेश विसर्जन मार्गावर तात्काळ स्वच्छता पथकांची नियुक्ती केली जाणार असून यावर्षी गणेश मूर्तीची उंची पहाता विसर्जनासाठी क्रेन आणि खास स्विमर्स क्लब कडून स्विमर्सची सोय करण्यात आली आहे.

पायपीट दरम्यान मनपा आयुक्तांनी शनी मंदिर सर्कल हेमु कलानी चौक येथे मोठे हाय मास्ट बसवा याशिवाय शनी मंदिर सर्कल जवळील तांत्रिक अडथळा दूर करून चौगुले यांना बांधकाम परवानगी देतो असे सांगत भिंत हटविण्याच्या सूचना दिल्या. रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक किर्लोस्कर रोड सह हुतात्मा चौक चालत पाहणी केली रामदेव गल्ली येथील खुल्या गटारी बुझवा अश्या सूचना करत हुतात्मा चौक, नरगुंदकर भावे चौक ,संयुक्त महाराष्ट्र चौक व मार्केट परिसरातील गणेश मंडळांना भेटी देत गणपत गल्लीतील फुटलेला रस्ता पूर्ण करण्याचे आदेश दिले . यावेळी पाहणी दौऱ्यात आरोग्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते अधिकारीही सहभागी झाले होते.

 

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.